थोडक्यात माहिती
Lek Ladki Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये 'लेक लाडकी योजना' सुरू केली आहे, ज्याअंतर्गत राज्यातील मुलींना जन्मापासून ते 18 व्या वर्षीपर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली जाईल. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे.
योजनेचे नाव |
लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana |
योजना सुरू होण्याचे वर्ष |
2023-2024 |
कोणी सुरू केली |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य |
महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
परिस्थिती |
◉ Live |
👉 मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे. |
👉 मुलींच्या शिक्षणास चालना देणे. |
👉 मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे. |
👉 कुपोषण कमी करणे. |
👉 शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. |
👉 मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून 5000 रुपयांचे सहाय्य दिले जाते. |
👉 मुलगी शालेय शिक्षणाच्या पहिल्या इयत्तेत प्रवेश करताच 6000 रुपयांची मदत मिळते. |
👉 सहावी इयत्तेत प्रवेश करताच 7000 रुपयांची मदत मिळते. |
👉 अकरावीमध्ये प्रवेश घेताच 8000 रुपयांची आर्थिक सहाय्य प्रदान केली जाते. |
👉 मुलीच्या 18 व्या वर्षी सरकारच्या वतीने 75,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. |
👉 ही योजना पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी असून, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी लागू आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या कुटुंबालाही ही योजना लागू होईल, मात्र लाभ मुलीला मिळेल. |
👉 पहिल्या आणि दुसऱ्या आपत्याच्या हप्त्यांसाठी अर्ज करत असताना, कुटुंब नियोजन केले असल्याचे प्रमाणपत्र आई-वडिलांकडून सादर करणे अनिवार्य आहे. |
👉 दुसऱ्या प्रसूतीत जुळी अपत्ये जन्माला आली असता, त्यात एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा समावेश असल्यास, त्या मुलींना लाभ दिला जातो. तथापि, यावेळी आई किंवा वडीलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. |
👉 १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा असलेले कुटुंब, त्या नंतर जन्मलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना देखील योजनेचा लाभ मिळवता येईल. |
👉 या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. |
👉 लाभार्थी कुटुंबाचे महाराष्ट्र राज्यात स्थायी निवासी असणे आवश्यक आहे. |
📜 पालकांचे आधार कार्ड |
📜 मुलीचे जन्म प्रमाणपत्र |
📜 पिवळे आणि केशरी रेशन कार्ड |
📜 उत्पन्न प्रमाणपत्र |
📜 बँक खाते माहिती |
📜 पासपोर्ट साईज फोटो |